कोल्हापूर -शहरातवडिलांच्या छातीत कात्री खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मणेरमाळ परिसरात ही घटना घडली असून किरकोळ वादातून वडिलांनी मारल्याने संतापलेल्या मुलाने वडिलांच्या छातीत कात्री खुपसली. चंद्रकांत सोनवले असे मयताचे नाव असून ज्ञानेश्वर सोनवले (वय 22) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
कोल्हापुरात किरकोळ कारणावरुन मुलाने छातीत कात्री खुपसली; वडील जागीच ठार - कोल्हापूर मुलाकडून वडिलाचा खून बातमी
वडील व मुलगा जेवत असताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वडिलांनी रागाच्या भरात ज्ञानेश्वरला तांब्या फेकून मारला. त्यामुळे संतापलेल्या मुलाने घरातील कात्रीने वडिलांच्या छातीवर सपासप वार केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने वडील चंद्रकांत सोनवलेंचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील उचगांव येथील मणेरमाळ परिसरातील इंद्रजीत कॉलनीत चंद्रकांत भगवान सोनवले हे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतात. चंद्रकांत हे पेंटर म्हणून काम करतात तर त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर सोनवणे हा काही कामधंदा करत नव्हता. आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान दोघे जेवत असताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वडिलांनी रागाच्या भरात ज्ञानेश्वरला तांब्या फेकून मारला. त्यामुळे संतापलेल्या मुलाने घरातील कात्रीने वडिलांच्या छातीवर सपासप वार केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने वडील चंद्रकांत सोनवलेंचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची माहीती मिळताच करवीरचे डीवायएसपी प्रशांत अमृतकर आणि गांधीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन याबाबत अधिक माहिती घेतली. शिवाय संशयीत ज्ञानेश्वर सोनवलेला ताब्यात घेतले आहे.