महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 18, 2022, 8:12 PM IST

ETV Bharat / city

Kolhapur North Bypoll : ठरलं! सेनेने काँग्रेससाठी कोल्हापूर उत्तरची जागा सोडली; आता काँग्रेस विरुद्ध भाजप लढत

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Bypoll) शिवसेनेने अखेर काँग्रेसला पाठिंबा दिला (Shivsena Support Congress) आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे आता काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत होणार आहे.

file photo
सत्यजित कदम-जयश्री जाधव फाईल फोटो

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Bypoll) शिवसेनेने अखेर काँग्रेसला पाठिंबा दिला (Shivsena Support Congress) आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झाली बैठक -

चंद्रकांत जाधव यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहायची असेल तर जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडून देऊ, असे पालकमंत्री सतेज पाटील तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही म्हंटले होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा सेनेचा बालेकिल्ला आहे म्हणत पक्षश्रेष्ठींकडून जे आदेश येतील त्यानुसार आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी म्हंटले होते. मात्र, आज मुंबई येथे झालेल्या चर्चेनंतर शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेचा काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत येथे पाहायला मिळणार आहे.

भाजपकडून सत्यजित कदम यांचे नाव :

दरम्यान, आजच कोल्हापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आपण कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सत्यजित उर्फ नाना कदम तसेच महेश जाधव यांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवली असून, सर्वांकडून सत्यजित कदम यांच्याच नावावर जोर आहे. त्यामुळे त्यांच्याच नावाला प्राधान्य देण्यात येणार असून, आता केवळ औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे जयश्री जाधव विरुद्ध सत्यजित कदम अशीच लढत होणार असे आता स्पष्ट झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details