कोल्हापूर- भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांचे नेहमीच सामाजिक कार्यात आपले योगदान राहिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा याचीच प्रचिती आली. संपूर्ण देशभरात संचारबंदीमुळे मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबीयांवर आता मोठं संकट उभं आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीला समरजितराजे धावून आले आहेत. कोल्हापूर येथील कनाननगर वसाहतीमध्ये गरीब व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबीयांना त्यांनी त्यांच्या घरातूनच जेवणाचे डबे पाठवले.
गरीब, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबीयांना समरजितराजेंनी पाठवले घरातून जेवणाचे डबे
कोल्हापूर येथील कनाननगर वसाहतीमध्ये गरीब व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबीयांना त्यांनी त्यांच्या घरातूनच जेवणाचे डबे पाठवले.
राजर्षी शाहू महाराज यांच्यापासून कनाननगर वसाहतीचा आणि घाटगे घराण्याचा जवळचा संबध आहे. आपल्या कुटुंबतीलच एक भाग म्हणत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. अचानक उद्भवलेल्या या वैश्विक संकटामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. या काळात अनेकांना पुरेसे अन्न मिळत नाहीये. त्यामुळे अशा परिस्थिती प्रत्येकाने आपल्या परीने अशा गरजू व्यक्तींना स्वतः घरात थांबून जी शक्य ती मदत करा असे आवाहन सुद्धा यावेळी समरजित घाटगे यांनी केले.