कोल्हापूर - 'मद्यालय सुरू पण विद्यालय बंद' अशी हाक देत कोल्हापूरातील होतकर कुटुंबातील बाप्पा शाळा सुरू करण्याची मागणी करत आहे. देशाचे उज्ज्वल भविष्य असणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यावर कोल्हापूरातील चिले कॉलनीतील रोहित होतकर यांच्या कुटुंबीयांनी शाळा सुरू करावा या मागणीचा देखावा साकारला आहे.
शाळा सुरू करावी या मागणीचा देखावा -
गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असून, विद्यार्थी घरात आहे. अनेक राज्यात शाळा सुरू झाली तरीही राज्यातील शाळा बंदच आहेत. या देखाव्यातून शाळा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यात शाळेत बसलेले विद्यार्थी, स्वागत करत असलेला उंदीर मामा आणि वर्गातील एकूण चित्र साकारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काळजीचे फलकही लावण्यात आले आहेत. शिवाय यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तोंडाला मास्कही घातला आहे.
विद्यार्थ्यांना आवाहन -
सध्या कोरोनाचा संसर्ग कमी नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. पण याचबरोबर विद्यार्थ्यांना ज्ञान तसेच जागरूक करणेही महत्त्वाचे आहे. कोरोनाविषयक सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करून शाळा सुरू करावी, असे आवाहन यातून करण्यात आले आहे.