कोल्हापूर - भुदरगड पोलिसांनी देवकेवाडी, नारगुंडी जगत परिसरतील तीन गावठी दारू हातभट्ट्या उद्धवस्त केल्या. या कारवाईत दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. नारगुंडीच्या हातभट्टी मालक अशोक तातवडेंच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगडमध्ये तीन हातभट्ट्या उद्ध्वस्त, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त - kolhapur police news
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगडमध्ये तीन हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. या छाप्यात सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भुदरगड तालुक्यातील फये जंगल परिसरात बेकायदेशीररित्या हातभट्टीची दारू तयार करून विक्री करत असल्याची माहिती भुदरगड पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत भुदरगड पोलिसांनी फये जंगल परिसरात एका हातभटीची दारू तयार करणाऱ्या गुत्यावर छापा टाकला. यावेळी त्यांनी देवकेवाडी येथे राहणारा संशयित हातभट्टी मालक दीपक बाजीराव पोरलेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दारू तयार करण्यासाठी लागणारे साडेसात हजार लिटर रसायन, एक ट्रॉली जळाउ लाकूड, मोटारसायकल आणि अन्य साहित्य असा सुमारे 4 लाख 73 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. दुसरीकडे वंजार जंगल परिसरातील आणखी एका हातभट्टीवर कारवाई करत देवकेवाडी इथल्या विजय येरंभ याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे 2 लाख 6 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सलग दुसऱ्या दिवशी भुदरगड पोलिसांनी नारगुंडी जगत परिसरातील हातभट्टी दारू गुत्यावर कारवाई करत दारू हातभट्टी उद्ध्वस्त केली. यावेळी एक मोटारसायकल आणि इतर साहित्य असा सुमारे 17 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हातभाटी मालक अशोक महादेव तातवडे यांच्याविरोधात भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.