महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विरोधकांना सत्ता गेल्याचे पचले व पटलेले नाही, हसन मुश्रीफांची टीका

कोरोना काळात संयमी मुख्यमंत्री नसता तर महाराष्ट्राचे काय झाले असते? हे कोडे परमेश्वराला देखील पडले असावे. म्हणून महाविकास आघाडी सत्तेत आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती हेदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करतात.

विरोधकांना सत्ता गेल्याचे पचले व पटलेले नाही, हसन मुश्रीफांची टीका
विरोधकांना सत्ता गेल्याचे पचले व पटलेले नाही, हसन मुश्रीफांची टीका

By

Published : May 31, 2021, 3:16 PM IST

Updated : May 31, 2021, 3:32 PM IST

कोल्हापूर : विरोधक सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून येऊन सुद्धा सत्ता येऊ शकली नाही. हे वास्तव त्यांना पचलेले आणि पटलेले नाही असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

विरोधकांना सत्ता गेल्याचे पचले व पटलेले नाही
तब्येतीची विचारपुस करण्यासाठी फडणवीस पवारांना भेटले असतील

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्याबद्दल मुश्रीफ म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून फडणवीस हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगत होते. शरद पवार यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला देवेंद्र फडणवीस हे साहेबांना भेटले असतील. ऑपरेशन नंतर फडणवीस यांनी शरद पवार साहेब यांची भेट मिळावी अशी विनंती केली होती. त्यावरुनच ही भेट झाली असावी असे मुश्रीफ म्हणाले.

संयमी मुख्यमंत्री नसता तर महाराष्ट्राचे काय झाले असते?
मुंबईच्या विकास कामांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. सर्व विकास कामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले आहेत. परमेश्वराची इच्छा असावी म्हणूनच महाविकास आघाडी सत्तेत आली. कोरोना काळात संयमी मुख्यमंत्री नसता तर महाराष्ट्राचे काय झाले असते? हे कोडे परमेश्वराला देखील पडले असावे. म्हणून महाविकास आघाडी सत्तेत आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती हेदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करतात असे गौरवोद्गार देखील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.

हेही वाचा -जीएसटी कौन्सिल समितीचे अध्यक्षपद मेघालयला, केंद्राकडून महाराष्ट्राचा अपमान - मुश्रीफ

Last Updated : May 31, 2021, 3:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details