महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापूरात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार याचा ठाम विश्वास - ज्योतिरादित्य शिंदे - kolhapur Airport

Jyotiraditya Shinde At kolhapur Airport
Jyotiraditya Shinde At kolhapur Airport

By

Published : Sep 3, 2022, 10:58 PM IST

Updated : Sep 4, 2022, 6:46 AM IST

22:25 September 03

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी विमानतळावर सुरू असलेल्या विकासकामांबाबत आढावा बैठक घेतली त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते.

ज्योतिरादित्य शिंदे

कोल्हापूरकोल्हापूर जिल्हा हा एक प्रगतीपथावर असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात नवीन कनेक्टिव्हिटी सुरू व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. लवकरच मुंबई-कोल्हापूर विमानसेवा (kolhapur Airport) सुद्धा सुरू होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचाही कोल्हापूरच्या विकासाबाबत प्रयत्न आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये विकासाचा एक नवीन अध्याय सुरू (New Chapter Of Development In Kolhapur) होईल याचा आपल्याला नक्कीच विश्वास असल्याचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांनी म्हंटले. कोल्हापुरातील विमानतळावर सुरू असलेल्या विकासकामांबाबत आढावा बैठक घेतली त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते.

मार्च 2023 पर्यंत कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल पुर्ण करणारकोल्हापूर विमानतळाचा विस्तार आणि येथील विकास कामे वेगाने सुरू आहेत. त्यातीलच एक महत्वाचा भाग म्हणजे येथे सुरू असलेल्या वर्ल्ड क्लास टर्मिनल बिल्डिंगचे काम. सध्या याचे 60 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या मार्च 2023 पर्यंत याचे काम पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. आयोजित आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. शिवाय अनेक विकासकामे आहेत ती सुद्धा पूर्णत्वास येतील असा विश्वास सुद्धा शिंदे यांनी व्यक्त केला.

Last Updated : Sep 4, 2022, 6:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details