महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बोटीत उतरण्यासाठी NDRF जवानाने वृद्ध महिलेला दिला आपल्या पाठीचा आधार

सांगली आणि कोल्हापुरात पुराचा कहर सुरुच आहे. NDRF, लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. जवान जीवाचे रान करून मदत कार्य करत आहेत. अशाच एका रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

बोटीत उतरण्यासाठी NDRF जवानाने वृद्ध महिलेला दिला आपल्या पाठीचा आधार

By

Published : Aug 11, 2019, 2:51 PM IST

कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरात पुराचा कहर सुरुच आहे. आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. NDRF च्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. अशाच एका रेस्क्यू ऑपरेशनचा अभिमानास्पद व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

बोटीत उतरण्यासाठी NDRF जवानाने वृद्ध महिलेला दिला आपल्या पाठीचा आधार

बोटीत उतरण्यासाठी NDRF जवानाने वृद्ध महिलेला दिला आपल्या पाठीचा आधार

गेल्या ६ दिवसांपासून जीवाचे रान करून रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशाच एक मदत कार्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात एका वृद्ध महिलेला NDRF जवान आपल्या पाठीचा आधार देऊन बोटीत बसवताना दिसत आहे. जवानाच्या या कृत्याचा सर्वांनाच अभिमान वाटत आहे. उपस्थीतांनीही टाळ्या वाजवून आभार मानले आहेत.

आतापर्यंत एकुण 4,13,945 लोकांचे स्थलांतर

गेले सहा दिवसांपासून दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराने घातलेला विळखा शनिवारी वेगाने सैलावू लागला. पावसाने घेतलेली विश्रांती आणि अलमट्टी धरणातून वाढवलेला विसर्ग यामुळे या दोन्ही शहरांतील पाणी झपाट्याने उतरू लागले आहे. पूरग्रस्त भागांतील मदतकार्याला वेग आला आहे. आतापर्यंत एकुण 4,13,945 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यात सांगलीतून 1,43,641 आणि कोल्हापुरातून 2,33,150 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details