कोल्हापूर -किरीट सोमैया यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नोटीस दिली आहे. नोटीसमध्ये सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्याने सोमैया यांच्या दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला असमर्थता दर्शवली आहे. त्यानंतरही भाजपा नेते किरीट सोमैय्या हे मुंबईहून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. मात्र सोमैय्या यांच्या विरोधासाठी कोल्हापुरातल्या रेल्वे स्टेशन बाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आतापासून जमायला सुरुवात झाली आहे, त्यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू आहे. शिवाय सोमैय्या यांचे पायताण घेऊन स्वागत करण्याचा इशारा सुद्धा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
कोल्हापुरात सोमैय्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक कोल्हापुरात तणावाचे वातावरण -
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा 127 कोटींचा घोटाळा बाहेर निघत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचा इशारा देत सोमैय्या मुंबईहून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. शिवाय कोणीही अडवून दाखवावे असेही त्यांनी म्हटल्याने आता कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
किरीट सोमैय्या कोल्हापूरकडे रवाना -
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर बैठकांसाठी सोमैय्या उद्या (सोमवारी) कोल्हापुरात जाणार होते. मात्र त्यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी येथे येऊ नका, अशी नोटीस दिली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी सोमैय्या यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा लावला. त्यांना स्थानबंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर झालेला हाय वोल्टेज ड्रामानंतर आता अखेर किरीट सोमैय्या महालक्ष्मी ट्रेनने कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. आता पुढे सोमैय्या यांना अटक होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीसनंतरही सोमैय्या कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.
हेही वाचा - सुरक्षा पुरवू शकत नसल्याने कोल्हापुरात न येण्याची सोमैया यांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस
हेही वाचा - ...अखेर किरीट सोमैया कोल्हापूरकडे रवाना