कोल्हापूर- शहरात विविध ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. प्रत्येक होर्डिंग वर मी पस्तावतोय असा उल्लेख मोठ्या अक्षरात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ही होर्डिंग्ज लावली असून यामध्ये कडकनाथ घोटाळा, महापूर, कांदा आयात, गडकोट किल्ले, एसआरए जमीन घोटाळा, आरे जंगल आदींचा उल्लेख करण्यात आला आहे.
मी पस्तावतोय... राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे होर्डिंग्ज - taunting on CM in kolhapur
कडकनाथ घोटाळा, महापूर, कांदा आयात, गडकोट किल्ले, एसआरए जमीन घोटाळा, आरे जंगल आदींचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे होर्डिंग्ज कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने लावण्यात आले.
मध्यरात्री कोल्हापूर शहरातील विविध भागांत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री यांच्या यात्रेवर अनेक ठिकाणी अनेक संघटनानांकडून रोष व्यक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल सांगलीकडे यात्रा जाताना इस्लामपूर रोडवर ताफ्यातील मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर कडकनाथ प्रकरणात अडकलेल्या शेतकऱ्यांनी कोंबड्या आणि अंडी फेकून मारली. तर काही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या होर्डिंगला अज्ञात व्यक्तीकडून काळे फासण्यात आले. आणि आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे होर्डिंग्ज लावण्यात आल्याने शहरात एकच चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा-कोल्हापुरात मुख्यमंत्री अन् महसूलमंत्र्यांच्या बॅनरवर फासले काळे