महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अलीकडे भाषण करण्याची मक्तेदारी ठराविक लोकांनी घेतली आहे - संजय राऊत

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा हा शनिवारी (दि. 28 मे) कोल्हापुरातून सुरू झाला असून शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) हे आज आणि उद्या कोल्हापूर दौऱ्यावर असून संजय राऊत यांनी सकाळपासूनच कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे गाठीभेटी घेत आहेत. तर कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल च्या मैदानात संजय राऊत यांची जाहीर सभा पार पडली.यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर टिकांची तोफ डागली असून सोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) व किरीट सोमैया ( Kirit Somaiya ) यांच्यावरही जहरी टीका केली आहे तसेच शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा मुखवटा फाडत खरे सत्य समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : May 28, 2022, 10:41 PM IST

कोल्हापूर - शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा हा शनिवारी (दि. 28 मे) कोल्हापुरातून सुरू झाला असून शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) हे आज आणि उद्या कोल्हापूर दौऱ्यावर असून संजय राऊत यांनी सकाळपासूनच कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे गाठीभेटी घेत आहेत. तर कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल च्या मैदानात संजय राऊत यांची जाहीर सभा पार पडली.यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर टिकांची तोफ डागली असून सोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) व किरीट सोमैया ( Kirit Somaiya ) यांच्यावरही जहरी टीका केली आहे तसेच शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा मुखवटा फाडत खरे सत्य समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बोलताना संजय राऊत

अलीकडे भाषण करण्याची मक्तेदारी ठराविक लोकानी घेतली आहे -कोल्हापूरची भूमी ही क्रांतिकारक असून तेवढीच दिलदार आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरने शिवसेनेला भरभरून दिले आहे. मात्र, पुन्हा एकदा शिवसेनेचा झंझावात दाखवण्याची वेळ असून आज बेळगावमधून अनेक लोक येथे आले आहेत. बेळगावमधील मराठी भाषिकांवर कर्नाटकी सरकार अत्याचार करत असून त्यांना फक्त कोल्हापूरचा आधार आहे. अलीकडे भाषण करण्याची मक्तेदारी ठराविक लोकानी घेतली असून, आम्ही भाषण केले तर इडी, सीबीआयच्या धाडी पडतात, अशी टीका केंद्र सरकार वर केले आहेत. तसेच लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करायचे सोडून मंदिर, भोंगे यांच्यावर चर्चा होत आहे. महागाई, शिक्षण हे खरे प्रश्न असून ते विचारले असता त्याचे उत्तर मात्र ज्ञानव्यापी मस्जिदमध्ये मंदिर शोधत असल्याचे उत्तर मिळत असल्याची टीका त्यांनी केली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिला की विरोधकांच्या पोटात दुखत असल्याची खोचक टीका त्यांनी विरोधकांना केली आहे तर अनिल परब यांच्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते म्हणून मुंबईत धाडी पडतात. केंद्र सरकारकडून सुडाच्या कारवाया शिवसेनेवर होत आहे, असे ही संजय राउत यांनी केली आहे.

शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीस यांचा खोटा मुखवटा फाडला -मी श्रीमंत शाहू महाराजांचा आभार व्यक्त करतो त्यांनी सर्वांचा संभ्रम दूर केला आणि देवेंद्र फडणवीस यांचा खोटा मुखवटा शाहू महाराजांनी फाडला. हा आई अंबाबाईने शिवसेनेला दिलेला प्रसाद आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना भासवले की शिवसेनेने संभाजीराजेंची कोंडी केली. मात्र, शाहू महाराजांच्या आजच्या वक्तव्यावरून फडणवीसांची कोंडी झाली असून भाजप जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. देशात सर्वात जास्त भ्रष्ट पक्ष असेल तर तो भाजप असून सर्वात जास्त साडेपाच हजार कोटी पैसा त्यांच्या तिजोरीत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

किरीट सोमैया यांच्यावर टीका - किरीट सोमैया यांच्यावर टीकेचा भडीमार केला असून आयएनएस विक्रांतमध्ये त्याने मोठा घोटाळा केला असल्याचे त्यांनी पुन्हा म्हटले आहे तर राज्यपाल हा भाजपचा कार्यकर्ता आहे. मात्र, त्यांनाच समजले नाही ते कोणत्या फाइलवर सही करत आहेत. किरीट सोमैया यांनी कोणतेही पैसे राज्यपाल कार्यालयाकडे दिलेले नाहीत, असे सही असलेले पत्र आम्हास दिले यामुळेच हा घोटाळा समोर आला, असेही संजय राऊत म्हटले आहेत.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लवकर दिलासा देणे गरजेचे - आमदार चंद्रदीप नरके -आमदार चंद्रदीप नरके यांनी यावेळी म्हणाले, या जिल्ह्यात आणि राज्यात जे राजकारण सुरू आहे हे आपल्याला माहीत आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली तेव्हा कोरोना महामारी आली. मात्र, यावेळी महविकास आघाडीने याचा सामना केला असून महापुरात ही शिवसेना मदतीत अग्रक्रमने होती असे ते म्हतले आहेत तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान लवकरात लवकर देणे गरजेचे असून संजय राऊत यांनी याचा पाठपुरावा करावा, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले आहे.

पक्षाशी एकनिष्ठ राहिले तर प्रसाद मिळतोच - संजय पवार -जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी म्हणाले, शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला असून शिवसेनेकडून कोल्हापुरात भरपूर काम झाले आहेत. मात्र, उर्वरित कामही लवकरात लवकर मार्गी लावू असे ते म्हटले आहेत. संजय पवार हा कोण आहे सर्वांना माहीत आहे. शाखाप्रमुखपासून ते जिल्हाप्रमुख असा माझा प्रवास असून पक्षाशी एकनिष्ठ राहिले तर प्रसाद मिळतोच, असे म्हणत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सर्वसामान्य शिवसैनिकाला थेट राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल आभार व्यक्त केला तसेच सर्वसामान्य माणसाला राज्यसभेची उमेदवारी ही फक्त शिवसेनाच देऊ शकते, असे ते म्हणाले असून सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेने झोकून देऊन काम करण्याचे आवाहन केले आहे.

...तर शिवसेनेचा महापौर बसवण्यास वेळ लागणार नाही -गेल्या 2 ते 3 वर्षात कोरोना काळ असल्याने शिवसेना आणि शिवसैनिकाना एकत्र येता आले नाहीत. यामुळे हे संपर्क अभियान सुरू असून येत्या काळात महानगर पालिका, जिल्हा परिषदेचा निवडणुका होणार असून शिवसेनेला प्रत्येक घराघरात पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सर्वांना एकत्र आणल्यास कोल्हापूर महानगर पालिकेत शिवसेनेचा महापौर बसवण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -Sanjay Raut on Shahu Maharaj Statement : भाजपने निर्माण केलेला संभ्रम शाहू महाराजांच्या विधानाने दूर झाला - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details