महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Prithviraj Chavan : मोदी सरकारचे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले : पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल - Indian GDP Going Down

देशातील वाढत्या महागाईवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला ( Prithviraj Chavan Criticized Modi Government ) आहे. मोदी सरकारचे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले असल्याचा आरोप त्यांनी केला ( Prithviraj Chavan On Indian Economy ) आहे.

पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण

By

Published : Apr 7, 2022, 5:54 PM IST

कोल्हापूर : वाढत्या इंधन दरामुळे जनता हैराण झाली ( Petrol Diesel Price Hike ) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जीडीपीचा दर सातत्याने कोसळत चालला ( Indian GDP Going Down ) आहे. या दरावर मोदी सरकारने गेल्या सात वर्षात 24 लाख कोटी गोळा केल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ( Prithviraj Chavan Criticized Modi Government ) केला. शिवाय मोदी सरकारचे देशाच्या अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुद्धा आता सुटत चालले आहे, असेही त्यांनी यावेळी ( Prithviraj Chavan On Indian Economy ) म्हटले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



शरण येण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय : यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ईडीच्या कारवाई इतक्या झाल्या पण एकही आरोप अंतिम टप्प्यापर्यंत गेलेला नाही. शरण येण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. हे अतिशय गंभीर असून, हे कुठेतरी थांबले पाहिजे. शिवाय भाजप चौकशी यंत्रणांचा वापर करत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कितीही प्रयत्न केले तरी सरकारला काही होणार नाही. यापुढे सरकार आणखी जोमाने काम करेल. वाढलेल्या महागाईवर बोलताना ते म्हणाले, युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय पेट्रोलियम दरामध्ये फार काही वाढ झालेली नाही. पण केंद्र सरकारने लावलेल्या करामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. केंद्राने एक्साईज ड्युटी कमी केली तर, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील असेही ते यावेळी म्हणाले.

मोदी सरकारचे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले : पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details