महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aaditya Thackeray criticized : फडणवीसांना सत्ता गेल्यापासून नैराश्य, त्यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही : आदित्य ठाकरे - आदित्य ठाकरे कोल्हापूर दौरा

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही. त्यांना सत्ता गेल्यापासून खूप नैराश्य आले आहे. त्यांच्यावर बोलण्यासारखं काही नाही, अशी टीका पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray in Kolhapur) यांनी केली. ते सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

Aaditya Thackeray
पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

By

Published : Feb 21, 2022, 4:37 PM IST

Updated : Feb 21, 2022, 5:35 PM IST

कोल्हापूर -देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही. त्यांना सत्ता गेल्यापासून खूप नैराश्य आले आहे. त्यांच्यावर बोलण्यासारखं काही नाही, अशी टीका पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray in Kolhapur) यांनी केली. नुकतेच फडणवीस यांनी हे सरकार इमारतींमध्ये अडकून पडले आहे असे म्हटले होते. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे - पर्यावरण व पर्यटन मंत्री
  • लक्ष विचलित करण्यासाठी विरोध पक्षाकडून खालच्या पातळीवर टीका :

नारायण राणे यांच्या बंगल्यावरील कारवाई सूडबुद्धीने सुरू आहे अशी विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. याबाबत बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, या विषयात मी जाणार नाही, आम्ही आमचे काम करत राहणार. पण महत्वाचे म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून आपण बघत असाल उत्तर प्रदेशमधील बेरोजगारी, तिथल्या समस्या यावरून लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष येथे काम करत आहेत. शिवाय टीका करत असताना विरोधी पक्षाने खालची पातळी गाठली आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

  • पंचगंगा प्रदूषणाबाबत लवकरच ठोस निर्णय घेऊ :

यावेळी पंचगंगेच्या वाढलेल्या प्रदूषणाबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, याबाबतसुद्धा आढावा बैठकीत चर्चा झाली आहे. प्रदूषणाचा मुद्दा महत्वाचा आहे. त्यावर उपाययोजनांबाबत प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्वच्छता मोहिमांपासून इतर अनेक पर्याय अवलंबले जात आहेत. शिवाय प्रदूषण रोखण्याबाबत डीपीआर प्राप्त झाला असून त्यानुसार लवकरच काम सुरू करू, मात्र सद्यस्थितीत नदीमध्ये गटारीचे पाणी कुठे मिसळत आहे? उद्योग तसेच कारखान्यांचे पाणी कुठे मिसळत आहे याबाबतचा अभ्यास करून त्यांचे पाणी त्याठिकाणीच अडवून त्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय सद्याच्या नदीतील पाण्याचाही अभ्यास सुरू असून, त्यानुसार पुढील निर्णय घेऊ, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

  • आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर -

राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray in Kolhapur) यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. आदित्य ठाकरे हे रविवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज ते अंबाबाई मंदिरात आले. त्यांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच देवीच्या उत्सव मूर्तीस अभिषेकही केला. त्यानंतर त्यांनी साक्षी गणपतीचे दर्शन घेतले. तसेच मणकर्णिका कुंड बांधकामाची पाहणी केली.

Last Updated : Feb 21, 2022, 5:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details