कोल्हापूर : गेल्या काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या द काश्मीर फाइल्स चित्रपटावरून राज्यात वाद होताना पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा यासाठी भाजपने मागणी केली असताना आज कोल्हापुरात काही हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. द काश्मीर फाईल हा चित्रपट कर मुक्त करावे याच बरोबर पावनखिंड चित्रपटही करमुक्त करावा अशी मागणी या संघटनांनी केली ( Make Pavankhind The Kashmir Files Tax Free ) आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले आहे.
Demand of Pro-Hindu Organizations : 'द काश्मीर फाइल्स' सह पावनखिंड चित्रपटही करमुक्त करा : हिंदुत्ववादी संघटनाची मागणी
नुकतेच प्रदर्शित झालेल्या पावनखिंड ( Pawankhind Marathi Movie ) आणि द कश्मीर फाईल्स ( The Kashmir Files Movie ) या दोन्ही चित्रपटांना करमाफी देण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली ( Make Pavankhind The Kashmir Files Tax Free ) आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना निवेदन देण्यात आले.
भाजपशासित राज्यात कश्मीर फाईल्स करमुक्त
सध्या सर्वत्र 'द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीरच्या इतिहासातील एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. १९९० साली काश्मीरमध्ये जे घडले ते सारे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तर या चित्रपटाचे कौतुक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींयांनीही केलं आहे. तसेच देशातील काही भाजप शासित राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप हा चित्रपट करमुक्त झाला नसल्याने भाजपकडून सातत्याने चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत असताना शिवसेना चित्रपटावरून राजकारण करत असल्याचे म्हटले आहे.