कोल्हापूर - ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात ( Govind Pansare Murder Case ) सरकारी पक्षाकडे कोणताही सबळ पुरावा नसल्याने यातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे आणि सचिन अंदुरे यांना दोषमुक्त करावे, असा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश शेळके यांनी हा अर्ज फेटाळला. अॅड. शिवाजीराव राणे यांनी ही माहिती दिली.
Govind Pansare Murder Case : वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरे यांचा दोषमुक्त करण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात ( Govind Pansare Murder Case ) सरकारी पक्षाकडे कोणताही सबळ पुरावा नसल्याने यातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे आणि सचिन अंदुरे यांना दोषमुक्त करावे, असा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश शेळके यांनी हा अर्ज फेटाळला. अॅड. शिवाजीराव राणे यांनी ही माहिती दिली.
चार महिन्यांपूर्वी केला होता अर्ज -दरम्यान, गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सबळ पुरावा नसल्याने वीरेंद्र तावडे आणि सचिन अंदुरे यांना दोषमुक्त करावे, असा अर्ज आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी चार महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडे ( Kolhapur Session Court ) केला होता. मात्र, सरकारी पक्षाने खटला चालवण्याइतके सबळ पुरावे न्यायालयात सादर केले. त्यामुळे आरोपींना दोषमुक्त करण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी याबाबत माहिती दिली.
हेही वाचा -Ambabai Temple Kolhapur : अंबाबाई मंदिरात भाविकांचे पाकीट मारणाऱ्या महिलेला पकडले, पाहा व्हिडिओ