महापुरात चोरीला गेलेले दागिने पोलीस प्रशासनाकडून संबंधितांना केले परत - kolhapur jewelry stolen news
कोल्हापूर पोलिसांनी महापूराच्या काळात चोरीला गेलेले दागिने पूरग्रस्ताना परत मिळवून दिले आहेत. यामुळे पूरग्रस्ताच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
कोल्हापूर पोलीस आणि पूरग्रस्त
कोल्हापूर - एखादा दागिना हरवला, चोरीला गेला किंवा कोणी हिसडा मारून पळवून नेला तर तो पुन्हा सापडेल की नाही याची खात्री नसते. चोरीला गेलेल्या या दागिन्यांमागील भावनिक आठवणीत रमण्याशिवाय काही पर्याय नसतो. कोल्हापूर पोलिसांनी मात्र चोरीला गेलेले दागिने चोरट्यांकडून हस्तगत करत ते संबंधितांना परत केले आहेत.