महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kolhapur Girl Climbed Everest : एव्हरेस्ट सर करणाऱ्या कस्तुरीला आर्थिक संकट; परतीचा प्रवासाला पैसे नसल्याने निघाली चालत - कस्तुरी सावेकर

जगातील सर्वात उंच आणि तितकेच अवघड असणारे माउंट एव्हरेस्ट तिने सर करत कोल्हापूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशभरात केले. 9 मे रोजी तिने माउंट एव्हरेस्टच्या चढाईला सुरुवात केली होती आणि 14 मे रोजी तिने एव्हरेस्टवर तिरंगा फडकवत कोल्हापूरच्या शिरपेचात मनाचा तुरा ( Kolhapur Girl Climbed Everest ) रोवला. असे असले तरी पैसे नसल्याने तिचा परतीचा प्रवास मात्र खडतर बनला असून तिला चालत यावे लागत आहे.

Kolhapur Girl Climbed Everest
एव्हरेस्ट सर करणाऱ्या कस्तुरीला आर्थिक संकट

By

Published : May 20, 2022, 12:41 PM IST

Updated : May 20, 2022, 3:46 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकरने अगदी लहान वयात पाहिलेले माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न अखेर दोन दिवसांपूर्वी पूर्ण ( Kolhapur Girl Kasturi Savekar climbed Everest ) केले. जगातील सर्वात उंच आणि तितकेच अवघड असणारे माउंट एव्हरेस्ट तिने सर करत कोल्हापूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशभरात केले. 9 मे रोजी तिने माउंट एव्हरेस्टच्या चढाईला सुरुवात केली होती आणि 14 मे रोजी तिने एव्हरेस्टवर तिरंगा फडकवत कोल्हापूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला. असे असले तरी पैसे नसल्याने तिचा परतीचा प्रवास मात्र खडतर बनला असून तिला चालत यावे लागत आहे. पाहुयात यावरचाच विशेष रिपोर्ट...

माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी लागतो इतका खर्च -दरम्यान, माउंट एव्हरेट सर करण्यासाठी जवळपास 50 लाख इतका खर्च येतो. मात्र आपल्या मुलगीची असलेली जिद्द पाहून कस्तुरी सावेकर हिचे वडील दिपक सावेकर यांनी अनेकांकडून हातउसणे तर काही दानशूर व्यक्तींनी सुद्धा त्यांना मदत केली आहे. मोहीम फत्ते करेपर्यंत त्यांच्याकडे एकूण 28 लाख 56 हजार इतके पैसे जमा झाले होते. मात्र अजूनही जे उरलेले पैसे त्यांनी संबंधित ठिकाणी भरले नाहीयेत. त्यामुळे आता उरलेले पैसे जमा करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. शिवाय ज्यांच्याकडून हातउसणे पैसे घेतले आहेत. त्यांना सुद्धा परत द्यावे लागणार आहेत. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांकडून तसेच दानशूर व्यक्तींनी, संघटनांनी, औद्योगिक संस्था, सहकारी संस्थांनी कस्तुरीच्या मदतीसाठी समोर यावे, असे कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनी आवाहन केले आहे. एकीकडे मुलीने एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद असला तरी एव्हरेस्ट एवढाच मोठा आर्थिक डोंगर आता त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी, असे आवाहन केले आहे.

कस्तुरी सावेकरने माउंट एव्हरेस्ट सर केल्याचा व्हिडिओ

...म्हणून कस्तुरीला यावे लागेल आहे चालत -दरम्यान, कस्तुरीच्या या मोहिमेसाठी एकूण 50 लाखांची गरज होती. त्यातील अर्ध्याहून अधिक रक्कम वडिलांनी जमवली आणि ती संबंधित आयोजकांना दिली. मात्र अजूनही काही रक्कम देणे बाकी असल्याचे तिचे वडील दीपक सावेकर यांनी म्हटले आहे. त्यानुसार एव्हरेस्ट सर केल्यानंतर बेस कॅम्पवर आल्यावर तिथून खाली नेपाळमधील लुक्ला येथे येण्यासाठी हेलिकॉप्टरची गरज असते. त्यासाठी 50 हजारांची गरज असते. मात्र ती सुद्धा द्यायला वडिलांकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिला ते पाठवू शकले नाहीत. म्हणूनच कस्तुरीला एव्हरेस्ट बेस कॅम्पपासून नेपाळमधील लुक्ला येथे चालत येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे एकीकडे एव्हरेस्ट सर केला असला तरी कुटुंबासमोर आता आर्थिक एव्हरेस्टचा डोंगर उभा राहिला असून सर्वांनी मदत करावी असे आवाहन तिच्या वडिलांनी केले आहे.

कोल्हापूरची एव्हरेस्ट सर करणारी पहिली व्यक्ती, अशी पार केली मोहीम - कस्तुरीने एव्हरेस्ट सर करणारच हा विश्वास यापूर्वी व्यक्त केला होता. त्यानुसार एवढे सर्व करण्यापूर्वी तिला अन्नपूर्णा शिखर सर केले. त्यानंतर कस्तुरी 4 मे रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्प वर पोहोचली. 9 मे रोजी रात्री 9 वाजता एव्हरेस्टच्या चढाईला सुरुवात केली. 10 मे रोजी दुपारी कॅम्प 2 वर पोहोचली. त्या ठिकाणी दोन दिवस थांबून 12 मे रोजी कॅम्प 3 वर पोहोचली. 13 मे रोजी दुपारी कॅम्प 4 वर पोहोचली. तेथे थोडी विश्रांती घेऊन रात्री 7 वाजता तिने फायनल समिट पुशला सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण रात्र चालून 14 मे रोजी सकाळी 6 वाजता तिने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा आणि करवीर नगरीचा भगवा ध्वज फडकवला. ही कामगिरी करणारी ती कोल्हापूरची पहिलीच व्यक्ती ठरली आहे.

गतवर्षी आले होते अपयश; मात्र जिद्दीमुळे एव्हरेस्ट ठेंगणे -कस्तुरी सावेकर हिने गतवर्षी सुद्धा माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या मोहिमेला गेली होती. केवळ शेवटचाच टप्पा राहिला असताना खराब वातावरणामुळे तिला मोहीम तिथेच थांबवून पुन्हा परतावे लागले होते. मात्र एव्हरेस्ट सर करण्याची असलेल्या जिद्द तिने सोडली नाही. अखेर तिने एव्हरेस्ट सर केल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची मान अभिमानाने उंचावली आहे.

होय सर्वात खडतर असणारे अन्नपुर्णा शिखर सर करणारी ती जगातली तरुण गिर्यारोहक ठरली होती - दरम्यान, अन्नपूर्णा शिखर सर करणारी सुद्धा कस्तुरी सावेकर ही जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली होती. मागील आठवड्यातच तीने कामगिरी करून दाखवली होती. ज्या शिखराचा डेथ रेट 34 टक्के इतका आहे जो माउंट एव्हरेस्ट पेक्षाही तीन पटीने जास्त आहे त्या शिखरावर तिने तिरंगा फडकवून मोठी कामगिरी केली होती. आता एव्हरेस्ट सर करून तिने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

हेही वाचा -Unique Marriage Proposal : कोल्हापुरात विवाहासाठी तरुणाचे असेही हटके प्रपोज, चर्चा तर होणारच...

Last Updated : May 20, 2022, 3:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details