कोल्हापूर -भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Bjp Leader Chandrakant Patil ) यांनी शिवसैनिक नाराज असून, मतांच्या माध्यमातून ती नाराजी दिसेल, असे वक्तव्य केले होते. त्याला आता शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर ( Shivsena Leader Rajesh Kshirsagar ) यांनी उत्तर दिले आहे. लोकांमध्ये केवळ संभ्रम निर्माण करण्याचा चंद्रकांत पाटील प्रयत्न करतात. आता लोक चंद्रकांत पाटील काय बोलतात हे बघायचेचे बंद करतील, असा टोला क्षीरसागर यांनी लगावला ( Rajesh Kshirsagar On Chandrakant Patil ) आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ( Kolhapur By Election ) जयश्री जाधव यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. क्षीरसागर यांनी स्वतः याठिकाणी पक्षाच्या आदेशानुसार अर्ज दाखल करताना उपस्थिती दर्शवली. त्यानंतर क्षीरसागर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
26 मार्च रोजी पुन्हा शिवसेनेचा मेळावा
राजेश क्षीरसागर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच नाराजी आहे. मात्र, सर्व शिवसैनिक पक्षप्रमुखांचा आदेश मानणारे आहेत. ज्यानुसार जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीशी उभारणार आहोत. शिवाय येत्या 26 मार्च रोजी शिवसेनेचा मोठा मेळावा घेत सर्वच शिवसैनिकांना आवाहन करणार आहोत, असेही क्षीरसागर यांनी म्हटले आहे. शिवाय चंद्रकांत पाटील जे म्हणतात त्याच्या विरोधातील चित्र इथे पाहायला मिळेल, असेही त्यांनी सांगितले आहे.