कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील वारसदारांची नाराजी समोर आली आहे. कोल्हापुरातील नर्सरी बागेत उभारण्यात आलेल्या शाहू समाधी स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला निमंत्रणच नसल्याने जनक घराण्यातील समरजित राजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आज सकाळी समरजित राजे यांनी समाधी स्थळावर येऊन शाहूंना अभिवादन केले. यावेळी त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.
राजर्षी शाहूंच्या समाधी स्मारक लोकार्पण सोहळ्याला जनक घराण्यालाच निमंत्रण नाही ! पाहा काय म्हणाले समरजितराजे - News about Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्मारक लोकार्पण सोहळ्याला जनक घराण्यालाच निमंत्रण नसल्याने समरजितराजे नाराज झाले आहेत. त्यांनी आज नर्सरी बागेतील समाधी स्थळावर येऊन शाहू महाराजांना अभिवादन केले.
पाहा काय आहे छत्रपती शाहु महाराज यांच्या जनक घराण्याचा इतिहास.....
शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 ला कागल येथील घाटगे घराण्यात झाला. घाटगे घराण्यात असताना त्यांचे यशवंतराव असे नाव होते. त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईंचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 ला यशवंतरावांना दत्तक घेतले. दत्तक घेतल्यानंतर यांचे शाहू हे नाव ठेवले. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर 1922 सालापर्यंत म्हणजेच 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.