कोल्हापूर - महापुरानंतर पुन्हा एकदा आता 3 ते 4 दिवसंपासून कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासांपासून तर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 148 मिमी तर जिल्ह्यात 478 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. जवळपास 7 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोल्हापूरात मुसळधार पावसाला सुरूवात हेही वाचा - पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापुरात दाखल
धरण क्षेत्रातातू सुरू असलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जवळपास 35 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे असाच पाऊस सुरू राहिला तर पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पत्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. पुढच्या 48 तासांत मुसळधार पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.
हेही वाचा -कोल्हापुरात पावसाची पुन्हा बॅटिंग; राधानगरीचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले