कोल्हापूर -जिल्ह्यातील अनेक भागात आज जोरदार पाऊस बरसला. कोल्हापूर शहरात सुद्धा पंधरा ते वीस मिनिटे सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला. दुपारपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारी तीनच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कलिंगड, काजू, आंबा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.
कोल्हापुरात मुसळधार; उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा, मात्र पिकांचे नुकसान
कोल्हापूर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे कलिंगड, साजू, आंबा आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
कोल्हापुरात मुसळधार पाऊस; उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा
एकीकडे लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके शेतातच उभी आहेत. त्यातच अशा वळवाच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा पुन्हा संकटात सापडत आहे. दुसरीकडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र आता दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.