कोल्हापूर - ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. कोल्हापुरातील माजी महापौर सुनील कदम यांनी पत्रकार परिषद घेत, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजकीय पदाचा गैरवापर करत महापालिकेची 15 गुंठे जमीन मुलाच्या नावे हडप केली असल्याचा आरोप केला आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.
हेही वाचा -शारदीय नवरात्रौत्सावाची तयारी जोरदार सुरू..अंबाबाईच्या रत्नजडित किरीटसह सोन्याच्या दागिन्यांना झळाळी
दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याकडे लोकशाही दिनानिमित्त तक्रार केली असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप देखील माजी महापौर सुनील कदम यांनी केला. जर अशा पद्धतीने लोकशाही दिनी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असेल तर, कार्यालयाच्या दाराबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा कदम यांनी दिला.