कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर शहरातील गृह विलगीलकरण केलेल्या रुग्णांशी फोनवरून आणि व्हिडीओ कॉल करून संवाद साधून विचारपूस केली. यावेळी रुग्णांनी प्रशासनाकडून योग्य सहकार्य होत असल्याचे सांगितले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महानगरपालिका पदाधिकाऱ्यांसोबत आज पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी रुग्णांसोबत फोन वरून चर्चा करून त्यांच्या तब्बेतची विचारपूस केली.
★कोल्हापूर शहरातील ६३ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे गृह विलगीकरणात :
कोल्हापूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रशासकीय पातळीवर आवश्यक सर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोल्हापूर शहरातील ६३ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. या रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून योग्य सेवा, मार्गदर्शन मिळते का नाही याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी रुग्णांशी, फोनच्या माध्यमातून आणि व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी वेगवेगळ्या गृह विलगीकरण असलेल्या रुग्णांनी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. यावेळी या रुग्णांनी महापालिका प्रशासनाकडून आपल्याला योग्य सहकार्य केले जात असल्याचे सांगितले. आरोग्य यंत्रणा आपल्यापर्यंत वेळेत पोहोचवून आवश्यक असलेले सर्व मार्गदर्शन केले. तर डॉक्टरांचेही मार्गदर्शन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.