कोल्हापूर -बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात जोरदार चर्चेत राहिलेला साताऱ्यातील स्पर्धक अभिजीत बिचुकले याला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने खंडणी प्रकरणात अभिजीत बिचुकले याला जामीन मंजूर केला असून त्याची आज सायंकाळी कळंबा कारागृहातून सुटका झाली. सुटकेनंतर कारागृहाबाहेर एका महिला चाहतीने बिचकुलेची भेट घेत 'तुम्हाला पुन्हा बिग बॉसमध्ये पाहायचे आहे' असे म्हटले.
'तुम्हाला बिग बॉसमध्ये पुन्हा पाहायचं आहे, महिला चाहतीने व्यक्त केल्या भावना' - महिला चाहती
36 दिवसांपासून बिचुकले कारागृहात होता. आता पुन्हा बिग बॉसमध्ये जाण्याचा बिचकुलेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, त्याने याबाबत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
आम्हाला पुन्हा तुम्हाला बिग बॉसमध्ये पाहायचं आहे, महिला चाहतीने व्यक्त केल्या भावना
36 दिवसांपासून बिचुकले कारागृहात होता. आता पुन्हा बिग बॉसमध्ये जाण्याचा बिचकुलेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, त्याने याबाबत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. सुटकेनंतर कारागृहाबाहेर आल्याचे पाहून एका 40 ते 45 वर्षीय एका महिला चाहतीने बिचकुलेची भेट घेत तुम्हाला पुन्हा बिग बॉसमध्ये पाहायचे आहे असे म्हटले आहे. बिचुकलेने सुद्धा भावूक होत माझ्यावर सर्वांचे असेच प्रेम राहु देत असे म्हटले आहे.