'गोकुळमधला अतिरिक्त सहभाग होता, तो बाहेर निघला' - बंटी पाटील
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यामध्ये सत्ताधाऱ्यांना धूळ चारत विरोधी आघाडीने 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवत आपल्याकडे सत्ता खेचून आणली. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.
कोल्हापूर : जनतेच्या मनातच सत्तांतर होते त्यामुळे एवढ्या मोठ्या मतांनी गोकुळमध्ये सत्तांतर झाले आहे. शिवाय गोकुळमध्ये जो अतिरिक्त सहभाग होता तो बाहेर निघला अशा शब्दांत गोकुळचे माजी अध्यक्ष आणि नुतन संचालक आबाजी उर्फ विश्वासराव पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यामध्ये सत्ताधाऱ्यांना धूळ चारत विरोधी आघाडीने 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवत आपल्याकडे सत्ता खेचून आणली. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.