कोल्हापूर: सध्या राज्यामध्ये शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून आम्ही म्हणजेच शिवसेना असल्याचा दावा केला गेला आहे. हा वाद आता न्यायालयात आहे. यातच निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या Andheri Assembly By Election पार्श्वभूमीवर 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवले. हा सगळा वाद एकीकडे सुरू असला, तरी कोल्हापूरात सुद्धा दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांची सुद्धा चिन्ह गोठविण्यात आली आहेत. आमदार विनय कोरे MLA Vijay Kore यांच्या जनसुराज्य शक्ती पक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी Former MP Raju Shetty यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुद्धा हक्काची निशाणी आयोगाच्या नियमानुसार गोठविण्यात आली आहेत.
'नारळ' नंतर 'नारळाची बाग' : कोल्हापूरच्या राजकारणात एक महत्वाचे नाव असलेले शाहुवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांनी सुद्धा 2004 मध्ये स्वबळावर पक्षाची स्थापना केली. जनसुराज्य शक्ती असे त्यांनी आपल्या पक्षाला नाव दिले. त्यांनी यापूर्वी 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र 2004 ची निवडणूक त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या माध्यमातून लढवली. यामध्ये त्यांनी आपल्या पक्षाकडून अनेकांना उमेदवारी सुद्धा दिली. पहिल्याच प्रयत्नात कोरे यांच्यासह एकूण 4 जणांनी गुलाल उधळत विधानसभा गाठली. त्यानंतर पुढील काही वर्षे याच चिन्हावर कोरे निवडणुकीला सामोरे गेले आहे.