कोल्हापूर -घरगुती गणेश विसर्जन राज्यभरात केले जात आहे. मात्र, कोल्हापूरकरांसमोर गणेश विसर्जनाचे संकट उभे ठाकले आहे. पंचगंगा नदी घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तिसऱ्यांदा पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने पंचगंगा नदीघाटावर अनेकजण मूर्तीदान करत आहेत. सामाजिक संघटनांनीही पंचगंगा नदीघाटावर जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. मूर्तीदान करण्याचे आवाहन सामाजिक संघटना प्रत्येकाला करत आहेत.
पंचगंगा नदी घाट पूर्णपणे पाण्याखाली; कोल्हापूरकरांसमोर गणेश विसर्जनाचे संकट
पंचगंगा नदी घाट पाण्याखाली गेल्याने गणेश विसर्जनाचे संकट कोल्हापूरकरांसमोर आले आहे. काही गणेशभक्त राजाराम तलाव, इराणी खण भागात गणेशाचे विसर्जन करत आहेत.
पंचगंगेच्या पूरामुळे कोल्हापूरात गणेश मूर्ती विसर्जनाचे संकट
पंचगंगा नदी घाटावर सध्या पाच ते सहा फूट पाणी असल्याने गणेश विसर्जन करता येत नाही. महापालिकेने मूर्तीदान करण्यासाठी जो मंडप उभारला होता, तो मंडपही आता पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विसर्जन करण्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, राजाराम तलाव, इराणी खण या भागात मात्र काही गणेशभक्तांनी गणेश विसर्जनाला सुरुवात केली आहे.