कोल्हापूर : आयुष्याच्या सुरुवातीलाच हृदयरोगासह दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्यच लोपलेले असते. आजारामुळे बाल जीवाला लागलेल्या घरघरीमुळे संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य हरवते. यशस्वी शस्त्रक्रिया होऊन रोगमुक्त झालेल्या या चिमुकल्यांच्या चेहर्यावरील त्याचा मनाला मोठा आनंद आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. छोट्या-छोट्या चिमुकल्यांच्या रोगमुक्तीच्या या सेवेचे फार मोठे आत्मिक समाधान मिळते, असेही ते म्हणाले.
कागलमध्ये रोगमुक्त बालकांचा हसन मुश्रीफांच्या हस्ते सत्कार - etv bharat maharshtra
कोरोना काळात लहान मुलांवरील गंभीर आजारांच्या दीडशेहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्यासाठी रोगमुक्त चिमुकल्यांचा सत्कार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
लहान मुलांवरील दीडशे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार
कोरोना संसर्गाच्या महामारीत लॉकडाऊन व कर्फ्यूमुळे राज्यातील मोफत वैद्यकीय उपचारांची सेवा बंद झाली होती. अलीकडेच ती सुरू झाल्यानंतर लहान मुलांवरील गंभीर आजारांच्या दीडशेहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्यासाठी रोगमुक्त चिमुकल्यांचा सत्कार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
रुग्णालयांसाठी सहा महिने शिक्षेची तरतूद
विशेष सहाय्य मंत्री असताना दवाखान्यांच्या धर्मदाय ट्रस्ट कायद्यामध्ये सुधारणा केली. गोरगरिबांवर दहा टक्के मोफत उपचार न करणाऱ्या दवाखान्यांच्या मालकांना सहा महिने शिक्षेची तरतूद केली. त्यामुळेच दुर्धर आजाराच्या गोरगरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवेची मोठमोठ्या दवाखान्याची दारे खुली झाली असेही मुश्रीफ म्हणाले.
हेही वाचा -आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा भ्रमाचा भोपळाही फुटणार - शिवसेना