कोल्हापूर- पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आज(सोमवारी) मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची बैठक होणार आहे. या बैठकीत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा होणार आहे. जर राज्य सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही. केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही. तसेच सामूहिक जलसमाधीचा निर्णय घेऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. दरम्यान रविवारी नृसिहवाडी परिसरात शेट्टी यांच्या आंदोलनाच्या परिसरात मोठ्याप्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
पूरगस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सामुदायिक जलसमाधीचा इशारा, राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक - नृसिंहवाडी शेतकरी आंदोलन
आंदोलनाच्या पाचव्या दिवशी राज्य सरकारने चर्चेची द्वारे खुली केल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटने सोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीनंतरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
बैठकीनंतर पुढील दिशा ठरवणार-
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 1 सप्टेंबर पासून सुरू झालेली पंचगंगा परिक्रमा यात्रेचा रविवारी नरसिंह वाडी येथे समारोप झाला. या आंदोलनानंतर जलसमाधी घेण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिल्यानंतर राज्य सरकारचे धाबे दणाणले होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी राज्य सरकारने चर्चेची द्वारे खुली केल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटने सोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीनंतरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
राजू शेट्टी पुढे म्हणाले, गेल्या पाच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनातील खदखद व्यक्त होत आहे. राज्य सरकार बद्दल प्रचंड संताप असून या यात्रेच्या माध्यमातून तो पाहायला मिळाला. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. 2019 च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, पूरबाधित क्षेत्रातील शेती कर्ज माफ व्हावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचे अनुदान तात्काळ जमा करावी, अशा पूरग्रस्तांच्या मागण्या आहेत.
आंदोलनाच्या पाचव्या दिवशी मुख्यमंत्री कार्यालयातून चर्चेसाठी फोन आला आहे. सोमवारी तीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत पुरगस्त शेतकऱ्यांच्या मागण्या आणि व्यथा मांडणार असून त्या मान्य करण्यासाठी आग्रह करणार आहे. जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना फिरू देणार नाही. तसेच गावोगावी सामुदायिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राजू शेट्टी यांनी दिला आहे.