कोल्हापूर- मतदान करणे आपला मुलभूत अधिकार आहे आणि तो सर्वांनी बजवावा, यासाठी कोल्हापुरातील एका मिसळ सेंटरने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. मतदान करून आल्यानंतर बोटाची शाई दाखवल्यावर मिसळवर चक्क 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. उद्यमनगरमधील लक्ष्मी मिसळ असे या सेंटरचे नाव असून मालक अमोल गुरव यांनी हा उपक्रम राबवला आहे.
मतदान केल्याचे शाईचे बोट दाखवा अन् मिसळवर मिळवा 10 टक्के डिस्काउंट - kolhapur assembly live
मतदान करून आल्यानंतर बोटाची शाई दाखवल्यावर मिसळवर चक्क 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. उद्यमनगरमधील लक्ष्मी मिसळ असे या सेंटरचे नाव असून मालक अमोल गुरव यांनी हा उपक्रम राबवला आहे.
हेही वाचा -मतदान करण्याचे शर्मिला ठाकरेंचे आवाहन; ठाकरे कुटुंबीयांनी केले मतदान
विशेष म्हणजे मिसळ सेंटरच्या बाहेरच त्यांनी एक सेल्फी पॉईंटसुद्धा उभा केला आहे. अनेकजण या सेल्फी पॉईंटला सेल्फी काढताना याठिकाणी पाहायला मिळत आहेत. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळीसुद्धा अमोल गुरव यांनी हा उपक्रम राबवला होता. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून आपल्यालासुद्धा शा पद्धतीने सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी भेटते याचे समाधान मिळते, असे अमोल गुरव यांनी म्हंटले आहे.