कोल्हापूर- माणसांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढल्याची चर्चा नेहमी होते. मात्र, प्राण्यांना कॅन्सर होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यातल्या त्यात सापांना कॅन्सर झालाय हे दुर्मिळच आहे. कोल्हापूरमध्ये असाच एक कॅन्सर असलेला सर्पमित्रप्रदीप सुतार यांनानाग आढळला. डॉक्टरांच्या तत्परतेने त्या नागावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.
आता चक्क सापालाही कॅन्सर, कोल्हापुरात झाली शस्त्रक्रिया - cobra
कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरात सर्पमित्र प्रदीप सुतार यांना हा नाग सापडला. नाग किंवा कोणताही साप पकडला की त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात येते. मात्र, एका सापाला कॅन्सर असल्याचे समोर आले आहे.
कोल्हापुरमधील फुलेवाडी परिसरात सर्पमित्र प्रदीप सुतार यांना हा नाग सापडला. नाग किंवा कोणताही साप पकडला की त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात येते. मात्र, या नागाच्या अंगावर एक गाठ होती. त्याच्या हालचालीही मंदावल्या होत्या. त्यामुळे सुतार यांनी नागाला वनविभागाच्या दवाखान्यात नेले.
वनविभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी त्या नागावर शस्त्रक्रिया केली. ती गाठ कॅन्सरची असल्याच समोर आले आहे. नागावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याला आता निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. काही दिवसात तो बरा झाल्यावर त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे.