महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rajya Sabha elections 2022 : महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप विजयी होणार- राहुल चिकोडे - भाजप

गेल्या काही वर्षात कोल्हापूरातून हद्दपार झालेली भाजप आज पुन्हा मैदानात उतरली आहे. धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik ) यांच्या रूपाने कोल्हापूरला भाजपचा खासदार मिळाला आहे. काल झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) उमेदवार संजय पवार यांना हरवून धनंजय महाडिक विजयी ( Dhananjay Mahadik won ) झाले आहेत.

Rahul Chikode
राहुल चिकोडे

By

Published : Jun 11, 2022, 3:40 PM IST

Updated : Jun 11, 2022, 4:05 PM IST

कोल्हापूर -गेल्या काही वर्षात कोल्हापूरच्या मैदानातून हद्दपार झालेली भाजप आज पुन्हा मैदानात उतरली आहे. धनंजय महाडिक ( Mahavikas Aghadi ) यांच्या रूपाने कोल्हापूरला भाजपचा खासदार मिळाला आहे काल झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ( Rajya Sabha Election 2022 ) महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार यांना हरवून धनंजय महाडिक विजयी ( Dhananjay Mahadik won ) झाले आहेत. यावेळी भाजप कार्यकत्यांनी कोल्हापुरातील बिंदू चौकात एकच जल्लोष केला.

राहुल चिकोडे

भारतीय जनता पार्टीत ऊर्जा -भाजपने कोल्हापुरात धनंजय महाडिक यांच्या रूपाने खाते उघडले आहे. या विजयामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली. कोल्हापुरातील बिंदू चौकात विजयाचा एकच जल्लोष केला. यावेळी एकमेकांना पेढे भरवत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president Chandrakant Patil ) यांनी केलेल्या व्यूहरचनेमुळे भाजप विजयी झाला. पुढील सर्व निवडणुका भाजप विजय होईल असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी व्यक्त केला आहे.

ढोल ताशाच्या गजरात जल्लोष -भाजप नेते धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर कार्यकत्यांनी बिंदू चौकात मुक्त गुलालाची उधळण केली. यावेळी कार्यकत्यांनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला आहे. येणाऱ्या कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप विजय होईल असा विश्वास भाजप नेते महेश जाधव यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- फडणवीसांच्या व्यूहरचनेपुढे महाविकास आघाडी सपशेल फेल, धनंजय महाडिक विजयी

Last Updated : Jun 11, 2022, 4:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details