कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदान आज सकाळपासून सुरू झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यातल्या विधानपरिषदेच्या सर्वच जागांवर भाजपचा विजय होईल, असा विश्वाससुद्धा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी येथील महाराष्ट्र हायस्कूल मधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील सर्व जागांवर भाजपचा विजय होईल - चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून राज्यातल्या विधानपरिषदेच्या सर्वच जागांवर भाजपचा विजय होईल, असा विश्वाससुद्धा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी येथील महाराष्ट्र हायस्कूलमधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील
जोपर्यंत नाथाभाऊ पक्षामध्ये होते तेव्हा आम्ही ते पार्टीमध्ये राहावे यासाठी अथक प्रयत्न केले होते. मात्र खडसे यांच्या बद्दल मी बोलणे बंद केले आहे. त्यामुळे आता नाथा भाऊंनी राष्ट्रवादीमध्ये सुखात राहावे, असा सल्ला देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'रात गई, बात गई' असेही म्हटले आहे आहे.
मुश्रीफ यांचे गौडबंगाल कळले नाही -
जगात चंद्रकांत पाटील कोणावरही बोलले तर ज्यांच्यावर बोललो ते कोणीही बोलत नाहीत. मात्र ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ लगेचच त्याचे प्रत्युत्तर देतात. याचे नेमके गौडबंगाल काय आहे हे समजले नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. जर मी मुख्यमंत्र्यांच्यावर बोललो असेल तर मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर द्यायची काय गरज? असा सवाल सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.