महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 25, 2020, 11:12 PM IST

ETV Bharat / city

सरसकट कर्जमाफी आणि महिलांच्यावरील वाढत्या अत्याचारा विरोधात भाजप रस्त्यावर

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचाराच्या विरोधात भाजपने कोल्हापूरात आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

bjp-protested-against-immediate-debt-waiver-and-rising-violence-against-women
सरसकट कर्जमाफी आणि महिलांच्यावरील वाढत्या अत्याचारा विरोधात भाजप रस्त्यावर

कोल्हापूर - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि महिलांच्यावर वाढत चाललेल्या अत्याचाराच्या विरोधात भाजप आज रस्त्यावर उतरले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

सरसकट कर्जमाफी आणि महिलांच्यावरील वाढत्या अत्याचारा विरोधात भाजप रस्त्यावर

महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच नाही. महाविकास आघाडी सरकारने या कर्जमाफीत अनेक प्रकारच्या अटी लावून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी म्हटले. शिवाय उद्धव ठाकरे यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीयेत. याचीच जाग आणण्यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन केल्याचे चिकोडे यांनी म्हंटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details