महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

छत्रपती घराण्याचे काम पेटवणे नाही; आम्ही योग्य वेळी ताकद दाखवू - खासदार संभाजीराजे - raigad rajayabhishek

नुकतेच भाजप नेते नारायण राणे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत संभाजीराजेंवर निशाणा साधत रयतेचा प्रश्न असेल तर लोकं पाठीशी असतातच, परंतु संभाजीराजेंच्या आजूबाजूला रयत कुठेच दिसत नाही. शिवाय त्यांच्या भूमिकेत धग दिसत नाही, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला संभाजीराजेंनी राणे यांचे नाव न घेता उत्तर दिले आहे.

खासदार संभाजीराजे
खासदार संभाजीराजे

By

Published : Jun 4, 2021, 11:38 AM IST

कोल्हापूर - छत्रपती घराण्यातील व्यक्तींचे काम पेटवणे नाही, तर न्याय देणे आहे. तसेच ताकदच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू, अशी प्रतिक्रिया देत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. नुकतेच भाजप नेते नारायण राणे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत संभाजीराजेंवर निशाणा साधत रयतेचा प्रश्न असेल तर लोकं पाठीशी असतातच, परंतु संभाजीराजेंच्या आजूबाजूला रयत कुठेच दिसत नाही. शिवाय त्यांच्या भूमिकेत धग दिसत नाही, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला संभाजीराजेंनी राणे यांचे नाव न घेता उत्तर दिले आहे.

काय म्हंटले होते नारायण राणे यांनी ?

पुण्यातील पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी संभाजीराजेंवर निशाणा साधून टीका केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हंटले होते की, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात फिरून आरक्षण नाही मिळत आणि पुढारी सुद्धा नाही बनता येते. समाजातील लोकांना वाटले पाहिजे राजे आहेत आणि त्यासाठी कार्य करावे लागते. रयतेचा प्रश्न असेल तर लोकं पाठीशी असतातच परंतु संभाजीराजेंच्या आजूबाजूला रयत कुठेच दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेत धग दिसत नाही. मराठा आरक्षणासाठी त्यांची भूमिका योग्य असेल तर मी त्याला पाठिंबा देईन, असेही राणे यांनी म्हंटले होते. त्यांच्या या टीकेनंतर आता संभाजीराजेंनी ट्विट द्वारे राणे यांचे नाव न घेता टीका केली आहे.


संभाजीराजेंचे उत्तर ...

संभाजीराजेंनी राणे यांना आपल्या ट्विटमधून त्यांचे नाव न घेता उत्तर दिले आहे. या ट्विट मध्ये संभाजीराजेंनी म्हंटले आहे की, छत्रपती घराण्यातील व्यक्तींचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही. त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे असेही संभाजीराजेंनी म्हंटले आहे.

संभाजीराजे छत्रपतींनी कोरोना काळात जनतेच्या जीवाची काळजी घेत रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला न येण्याचे आवाहन केले आहे. घरातूनच राज्याभिषेक सोहळा साजरा करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details