महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...अन् त्यांच्यावर आली अडगळीतले दिवे शोधण्याची आली वेळ; वीजबिल वसुली कारवाईचा असाही परिणाम - nitin raut

हावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गावातील 70 घरांचा वीज पुरवठा तोडला होता. यातील 35 जणांनी वीज बिल भरल्यानंतर त्यांचे कनेक्शन पुन्हा जोडण्यात आले. मात्र अचानक केलेल्या कारवाईने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

...अन् त्यांच्यावर आली अडगळीतले दिवे शोधण्याची आली वेळ; वीजबिल वसुली कारवाईचा असाही परिणाम
...अन् त्यांच्यावर आली अडगळीतले दिवे शोधण्याची आली वेळ; वीजबिल वसुली कारवाईचा असाही परिणाम

By

Published : Mar 12, 2021, 10:39 AM IST

कोल्हापूर : कोरोना काळातील वीज बिल थकलविल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दोनवडे गावातील अनेक घरांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. यामुळे दोनवडे गावातील नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ ओढविली आहे. घरात रात्री उजेडासाठी अडगळीत पडलेले दिवे, कंदील शोधण्याची वेळ येथील नागरिकांवर ओढविली आहे.

वीजबिल वसुली कारवाईमुळे नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ

वीज कनेक्शन तोडल्याने दोनवडे गावातील 35 घरांमध्ये सध्या दिव्याच्या उजेडात संसार सुरू आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गावातील 70 घरांचा वीज पुरवठा तोडला होता. यातील 35 जणांनी वीज बिल भरल्यानंतर त्यांचे कनेक्शन पुन्हा जोडण्यात आले. मात्र अचानक केलेल्या कारवाईने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ऊर्जा मंत्र्यांचे आदेश येताच कोणताही विचार न करता कनेक्शन तोडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
अडगळीतले दिवे शोधण्याची वेळ
लॉकडाऊन काळातील वीजबिल जास्त आले आहेत. त्यानंतर उर्जा मंत्र्यांनी यात सवलत देणार असे जाहीर केले होते. मात्र यातही काहीच सवलत मिळाली नाही. त्यामुळे सवलत मिळेल या आशेवर अनेकांनी वीजबिल भरले नाही. मात्र आता अनेकांचे वीजबिल हजारांच्या घरात गेले आहे. अनेकांना तर ते भरणेही मुश्किल झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी वीजकनेक्शन तोडण्यावर स्थगिती दिली होती. मात्र पुन्हा लगेचच ही स्थगिती उठविल्याने कनेक्शन तोडण्याची मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे आम्हाला अंधारातच रहावे लागत असल्याने, याची ऊर्जा मंत्र्यांनी दाखल घ्यावी असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
पुन्हा वीजबिल वसुलीचे आदेश
राज्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडित करण्यास 2 मार्च रोजी दिलेली स्थगिती उठविण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. थकबाकीदार ग्राहकांनी महावितरणची गंभीर आर्थिक स्थिती लक्षात घेता थकीत वीज बिले तात्काळ भरावी, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे. त्यानुसार पुन्हा एकदा वीज बिल वसुलीचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरुवातीलाच विरोधकांनी वीज बिलाचा मुद्दा उपस्थित करत गदारोळ घातला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडण्याच्या मोहीमेला स्थगिती दिली होती. मात्र अधिवेशन संपताच पुन्हा वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता अचानक कनेक्शन तोडायला सुरुवात झाल्यानंतर अनेकांवर अंधारात राहण्याची वेळ ओढविली आहे. करवीर तालुक्यातील दोनवडे गावातही हीच परिस्थिती पाहायला मिळाली.

ABOUT THE AUTHOR

...view details