कोल्हापूर - शहरातही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी 90 वर्षांच्या आजोबांनी दिवा लावत प्रार्थना केली. मधुकर कुंटे असे या 90 वर्षांच्या आजोबांचे नाव आहे.
कोल्हापुरातील 90 वर्षांच्या आजोबांनी दिवा लावत 'गो कोरोना गो'च्या दिल्या घोषणा - 90 age old
मधुकर कुंटे असे या 90 वर्षांच्या आजोबांचे नाव आहे.
kolhapur dipotsav
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिट घरातील लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती लावण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते.
दरम्यान, यावेळी कोल्हापुरातल्या जैन गल्लीतील 90 वर्षांच्या आजोबांचा उत्साह पाहायला मिळाला. आजोबांनी दिवा लावत गो कोरोनाच्या घोषणा दिल्या. त्यांच्या पत्नी विमल कुंटे यांच्यासोबत दिवा लावत मोदींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.