कोल्हापूर - जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असतानाच कोल्हापुरात आणखीन 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तीनही रुग्ण जिल्ह्यातल्या आजरा आणि चंदगडमधील आहेत. यामध्ये आजरा येथे 1 महिला आणि 1 पुरुष तर, चंदगडमध्ये 1 पुरुष अशा एकूण 3 रुग्णांचा समावेश आहे. सद्या कोल्हापुरात जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 4 वरून 7 वर पोहोचली आहे. मात्र, एकाच दिवशी 3 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने आजरा, चंदगडसह जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोल्हापुरात आणखीन 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण संख्या 17 वर
या तीनही रुग्णांना चंदगड आणि आजरा येथील कोरोना केअर सेंटरवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या तीनही रुग्णांना नेमका कोणाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली हे अद्याप अस्पष्ट आहे.
या तीनही रुग्णांना चंदगड आणि आजरा येथील कोरोना केअर सेंटरवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या तीनही रुग्णांना नेमका कोणाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे. त्यापैकी 9 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज दिला आहे. तर, एकजण मृत झाला आहे.
गुरुवारी 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे केवळ चारच रुग्ण जिल्ह्यात उरले होते. मात्र, पुन्हा 3 रुग्ण वाढल्याने हा आकडा 7 वर पोहोचला आहे. दरम्यान, आजरा आणि चंदगड शेजारीच बेळगाव जिल्हा येतो. त्या जिल्ह्यात कोरोनाचा मोठा कहर सुरू आहे. तिकडूनच या तालुक्यांमध्ये प्रसार झाला असल्याची शंका अनेकांनी उपस्थित केली असून याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही.