महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कल्याण-डोंबिवलीतील 97 पैकी 62 पोलीस कोरोनामुक्त; एका पोलिसाचा मृत्यू

कल्याण आणि डोंबिवलीतील 8 पोलीस ठाण्यांमधील 97 पोलिसांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यापैकी 62 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.

Police cured from corona
कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांचा सत्कार

By

Published : Jul 17, 2020, 1:15 PM IST

कल्याण-डोंबिवली(ठाणे)-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यापासून कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत 97 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 62 पोलीस कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केलेला लॉकडाऊन यशस्वीरित्या लागू करण्यात रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या पोलिसांची सर्वात महत्वाची भूमिका आहे. तपास नाक्यांवर असो की रुग्णालयात किंवा क्वारंटाइन सेंटर आणि कंटेंनमेंट झोन अशा प्रत्येक ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून पोलीस आपली जबाबदारी पार पाडत आहेत. दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून जबाबदारी निभावणाऱ्या हजारो पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे.

पोलिसांना जबाबदारी पार पाडताना फिजिकल डिस्टनसिंग ठेवता येत नाही. वेळोवेळी लोकांची मदत करावी लागते. त्यासाठी नागरिकांच्या संपर्कातच रहावे लागते. तसेच कंटेंनमेंट झोनमध्ये किंवा रुग्णालयांमध्ये ड्युटी असल्यास कोरोना संक्रमणाचा धोका वाढतो. वेळप्रसंगी पोलिसांच्या जिवावरही बेतले जाते.

डोंबिवली विभागाचा आढावा घेतला असता रामनगर, मानपाडा, विष्णुनगर आणि टिळकनगर अशी 4 पोलीस ठाणी येतात. या विभागात आतापर्यंत 41 पोलिसांना कोरोना संसर्ग झाला. तर 20 जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्या 19 जणांवर उपचार सुरू आहेत. यातील कोरोना मुक्त झालेल्या 20 जणांमधील बहुतांश पोलीस कामावर देखील रूजू झाल्याचे डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी सांगितले.

कल्याण विभागामधील महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडी आणि खडकपाडा या 4 पोलीस ठाण्यांतील आतापर्यंत एकूण 56 पोलिसांना कोरोना संसर्ग झाला आहे. यातील 42 पोलीस कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 14 पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details