महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

#Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'

कल्याण-डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आज आणखी तिघांना लागण झाल्याचे समोर आले आहे. संबंधित रुग्णांमध्ये एका सहा महिन्यांच्या चिमुरड्याचाही समावेश असल्याचे पालिकेने सांगितले. यामुळे आता रुग्णांची संख्या 24वर गेली आहे.

corona in thane
कल्याण-डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आज आणखी तिघांना लागण झाल्याचे समोर आले आहे.

By

Published : Apr 4, 2020, 5:15 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आज आणखी तिघांना लागण झाल्याचे समोर आले आहे. संबंधित रुग्णांमध्ये एका सहा महिन्यांच्या चिमुरड्याचाही समावेश असल्याचे पालिकेने सांगितले. यामुळे आता रुग्णांची संख्या 24वर गेली आहे.

आज आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये 41 वर्षाच्या पुरूषाचा समावेश असून ते डोंबिवली पश्चिमच्या गरिबाचा वाडा या भागातील आहेत. तर, असून उर्वरित दोन रुग्ण कल्याण पश्चिमच्या चिकणघर परिसरात नुकत्याच सापडलेल्या कोरोनाबाधितांचे निकटवर्तीय आहेत. यामध्ये 60 वर्षांच्या महिलेसह सहा महिन्यांच्या चिमुरड्याचा समावेश आहे. हे तीनही रुग्ण कस्तुरबा रुग्णातलयात उपचार घेत आहेत.

मनपा हद्दितील एक रुग्ण पूर्णत: बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे पालिकेने सांगितले. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील डिस्चार्ज देण्यात अलेल्यांची संख्या पाच आहे. तर सद्यः स्थितीत महापालिका क्षेत्रातील एकूण १९ कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details