ठाणे - कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेत फेरीवाल्यांमध्ये गुटखा विक्री करण्यावरून वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, राडा करणाऱ्या दोघांनी एकाला बेदम मारहाण करत त्याच्यावर चाकू व ब्लेडने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी राडेबाजांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. अंकुश सरोज (रा. अंबरनाथ), मोहम्मद शेख (रा. कुर्ला), असे अटक आरोपींची नावे आहेत. पवन गुप्ता, असे जखमी फेरीवाल्याचे नाव असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धावत्या रेल्वेमध्येच घटना, प्रवाशांमध्ये गोंधळ
कल्याण स्थानकातून शुक्रवारी (दि. 15) सायंकाळच्या सुमारास उत्तरप्रदेशला जाणारी गोरखपूर एक्सप्रेस रवाना झाली. त्यावेळी बोगी क्रमांक एस 5 मध्ये उल्हासनगरमध्ये राहणारा सराईत गुन्हेगार पवन आणि आरोपीमध्ये गुटखा विक्रीवरुन झालेल्या जुन्या भांडणांचा वाद पुन्हा झाला. त्यावेळी आरोपी अंकुश आणि मोहम्मद तसेच त्यांच्या एका साथीदाराने मिळून पवनवर धावत्या रेल्वेतच धारदार चाकू व ब्लेडने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना पाहताच प्रवाशांमध्ये गोधंळ उडाला होता.
आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी