औरंगाबाद- पाण्याची मोटार लावत असताना विजेचा धक्का लागून एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सिडको भागात घडली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनंदा राहुल जोगदंड (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या एन ११ येथील नवनाथ नगरहडको भागात राहत होत्या.
पाण्याची मोटार लावत असताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू - विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
नळाला पाणी आल्याने सुनीता यांनी पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटार लावली. यावेळी त्यांना विद्युत वायरचा धक्का लागल्याने त्या बेशुध्द अवस्थेत जमिनीवर कोसळल्या. मृत सुनंदा या एन ११ येथील नवनाथ नगरहडको भागात राहत होत्या.
नळाला पाणी आल्याने सुनंदा यांनी पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटार लावली. यावेळी त्यांना विद्युत वायरचा धक्का लागल्याने त्या बेशुध्द अवस्थेत जमिनीवर कोसळल्या. दरम्यान ही बाब त्यांच्या पतीच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा -बंदीचा आदेश झुगारुन बावधन येथे बगाड यात्रा, शंभरहून अधिक जणांना अटक