औरंगाबाद- अरुण जेटली यांच्या निधनाने अभ्यासू आणि शिस्तप्रिय नेता देशाने गमावल्याची भावना राज्यमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली. देशासाठी हिताचे आणि योग्य निर्णय अरुण जेटली यांनी घेतले होते. इतकेच नाही तर भाजपच्या विस्तारात जेटलींचे मोठे योगदान असल्याचे देखील अतुल सावे यांनी सांगितले.
Arunjaitlye Death : अभ्यासू आणि शिस्तप्रिय नेता हरवला - अतुल सावे - arun jaitley death
राज्यमंत्री अतुल सावे यांनी अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. अतिशय शिस्तप्रिय, मितभाषी नेत्याच्या जाण्याने भाजपसहित देशाचीही हानी झाल्याचं मत सावे यांनी व्यक्त केले.
अरुण जेटली मंत्री असताना जीएसटीसारखा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. देशातील व्यापाऱ्यांना त्याचा चांगलाच फायदा झाला. त्यांच्या निर्णयाने व्यापाऱ्यांना कर प्रणालीत एक खिडकी योजना असल्याने कर भरण्यात मोठा दिलासा मिळाल्याचे देखील अतुल सावे यांनी सांगितले.
जेटली यांनी भाजप वाढवण्यात मोठे योगदान दिले. ते अतिशय शिस्तप्रिय होते. कामात त्यांची शिस्त दिसून येत होती. बोलणे कमी असले तरी कामात त्यांचा कोणी हात पकडू शकत नव्हते. जेटली यांना पाच ते सहा वेळा भेटण्याचा योग आला. त्यांच्या सोबत बोलताना वेगळाच आनंद मिळत होता. त्यांच्या जाण्याने भाजपसहित देशाचीही हानी झाल्याचे मत अतुल सावे यांनी व्यक्त केले.