औरंगाबाद - मुलींवरून तरुणांमध्ये होणारी मारामारी आपण चित्रपटात अनेकवेळा अनुभवली असेल. मात्र असा प्रत्यक्ष प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. जालाननगर भागातील उद्यानात दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. उपस्थितांमधील एकाने याचा व्हिडिओ तयार केलाय. या उद्यानात एका युवकाची दुसऱ्यासोबत बाचाबाची झाली. यानंतर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने सध्या परिसरात दहशत आहे.
'ती'चा वाद भोवला... औरंगाबादेत तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी 'ती' चा वाद भोवला
जालाननगर भागातील उद्यानात मुलीच्या वादातून युवकांचे 2 गट आपसात भिडले. यानंतर राडा सुरू झाला. फिल्मी स्टाईल मारामारीचा अनुभव सगळ्यांनी घेतला. धिंगाणा घालून संपूर्ण जालाननगर परिसरात युवकांनी दहशत माजवली.
हातात लाठ्याकाठ्या घेऊन युवक एकमेकांना मारहाण करत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटस्थळी पोहोचले आणि सगळ्यांनी पोबारा केला. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाहीय. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.