औरंगाबाद -सत्तार तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पैसे घेऊन लखपती झालात मात्र मी लोकपती आहे, असे विधान करत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेने बंडखोर आमदारांवर केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांचे वक्तव्य मिश्कीलपणे असले तरी त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्यासोबत महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) आणि शिवसेनेसोबत असलेल्या पन्नास आमदारांनी बंड पुकारून सुरत आणि गुवाहाटी गाठली. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी गेलेल्या आमदारांना पैश्यांची आमिष दाखवून पळवले आहेत. इतकंच नाही पन्नास कोटी रुपये प्रयेक आमदाराला देण्यात आल्याचा आरोप सेनेने केला होता. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी नेहमीच जोरदार टीका त्यावरून केली आहे.
'रावसाहेब दानवेंनी केला शिक्कामोर्तब' : सिल्लोड येथे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित केली. या सभेत केंद्रीय राज्य मंत्री खासदार रावसाहेब दानवे हे देखील उपस्थितीत होते. त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात त्यांच्या मिश्किल शैलीत सत्तार साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपयोग करून काही काम करून घ्या. तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊन लखपती झालात. मात्र मी लोकपती आहे. रुग्णालयात होतो तरी निवडून आलो. या निवडणुकीत तुम्ही देखील माझ्या प्रचाराला कराल, असे वक्तव्य करत शिवसेनेने केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केल्याचे पाहायला मिळाले.