औरंगाबाद - दुचाकीवर बसून जाणाऱ्या तीन विनामस्क युवकांनी पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सिडको चौकात घडला. याप्रकरणी सिडको पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
औरंगाबादमध्ये दुचाकीवर जाणाऱ्या तीन मद्यपींची पोलिसाला मारहाण - औरंगाबाद न्यूज
कोरोनामुळे लागू असलेल्या नवीन नियमावलींचे पालन करताना रात्रीच्या वेळी पोलीस नाकाबंदी करताना दुचाकीवर विनामास्क जाणाऱ्यांना पोलिसांनी अडवले. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तिघांनी पोलिसांसोबत वाद घालायला सुरुवात केली.
पोलिसाला मारहाण
शुक्रवारी व्हिडिओ झाला व्हायरल
गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या वादाचा व्हिडियो शुक्रवारी व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये प्रताप जगताप, आकाश कुलकर्णी, आशुतोष झिंझोडे हे तिघे पोलिसांसोबत वाद घालून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे दिसून आलं. हल्ला करणाऱ्या तिन्ही तरुणाची सिडको पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -Political Analysis : दिल्लीतील वाढलेल्या राजकीय गाठीभेटींचा नेमका अर्थ काय?