औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका युट्यूब पत्रकाराने तरुणीची गळा चिरून हत्या केली आहे. शहरातील हडको कॉर्नरजवळील डिमार्ट जवळ एका खोलीत तरुणीचा खून करून मृतदेह घेऊन जात असतांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. lover killing the beloved due to a love affair प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे. अंकिता श्रीवास्तव असे मृत महिलेचे नाव असून, सौरभ लाखे असे आरोपीचे नाव आहे.
सौरभचं नेहमी येणे जाणेयाबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सौरभ आणि अंकिता यांचे प्रेमप्रकरण होते. सौरभ हा औरंगाबादच्या शिऊर गावात राहायचा. तसेच तो एका युट्यूब चैनलला पत्रकार म्हणून काम करायचा. दरम्यान मयत मुलगी अंकिता जालना जिल्ह्यातून एमपीएससी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी औरंगाबादमध्ये आली होती. याच काळात सौरभ आणि अंकिता यांच्यात प्रेम झाले. अंकिता राहत असलेल्या रूमवर सौरभचे नेहमी येणे जाणे होते.
तीन दिवसांपूर्वी केला खूनसौरभ हा तीन दिवसांपूर्वी अंकिताच्या रूमवर आला होता. त्यावेळीच त्याने खून केल्याचा संशय आहे. कारण गेली तीन दिवस या रूमला बाहेरून कुलूप होते. आज सकाळी सौरभ पुन्हा परत आला आणि दरवाजा उघडून मृतदेह पोत्यात भरून चारचाकी गाडीत टाकून निघून गेला. मात्र याचवेळी त्याने घराचा दरवाजा उघडाच ठेवला. त्यामुळे घरातून वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले असतांना त्यांना रक्ताचा सडा पाहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.