महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sujat Ambedkar on Brahmins : दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात - सुजात आंबेडकर - ब्राम्हण सुजात आंबेडकर वादग्रस्त विधान

दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात, असे वादग्रस्त ( Sujat Ambedkar comment on Brahmins ) वक्तव्य वंचीत बहूजन आघाडीचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर ( Sujat Ambedkar ) यांनी केले आहे. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात ( MGM College Aurangabad Sujat Ambedkar ) आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Sujat Ambedkar on Brahmins and riots
दंगली सुजात आंबेडकर वादग्रस्त विधान

By

Published : Apr 12, 2022, 11:14 AM IST

औरंगाबाद - दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात, असे वादग्रस्त ( Sujat Ambedkar comment on Brahmins ) वक्तव्य वंचीत बहूजन आघाडीचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर ( Sujat Ambedkar ) यांनी केले आहे. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात ( MGM College Aurangabad Sujat Ambedkar ) आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यामुळे, त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया देताना सुजात आंबेडकर

हेही वाचा -Load Shedding in Maharashtra : राज्यात कोळसा नसल्याने भारनियमन होईल, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे संकेत

हनुमान चालिसा पठण वरून टिका :आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या, बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितले की, दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रभावित होऊन दंगलध्ये जे उतरतात, प्रत्यक्षात ते बहुजन मुले असतात, असे सुजाता आंबेडकर ( Sujat ambedkar speech ) म्हणाले. तसेच, राज ठाकरेंना माझे एवढेच म्हणणे होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावे, अशी टिका देखील सुजात यांनी केली.

भाजपावर टीकास्त्र :लोकांचा भूकमरीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न असे सर्व आश्वासन देऊन भाजप केंद्रात सत्तेत आले. पण, सत्तेत आल्यावर यावर कुणीही बोलायला तयार नाही. कोरोना काळात सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती, त्यावर कुणीही बोलत नाही. असे असतानाही जर भाजपा किंवा राज ठाकरे ( Sujat ambedkar on Raj Thackeray speech ) असेच हिंदू-मुस्लीम दंगलीवर बोलत असेल तर त्याचा सरळसरळ असा अर्थ होतो की, येथील लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. जेणेकरून महत्वाच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष जाऊ नयेत, अशी टीका सुजाता आंबेडकर यांनी केली.

सरकार कोणतेही असो धोरण बदलत नाही :राज्यात आतापर्यंत मतदारांनी सर्वच राजकीय पक्षांच्या सत्ता अनुभवल्या आहेत. त्यात आघाडी, युती आणि महाविकास आघाडी सर्वच सत्ताधारी राहिले. सत्तेत कोणीही असो, ध्येय धोरण मात्र बदलली नाहीत. त्यामुळे, सत्तेत कोणीही असले तरी फरक पडत नाही, असे मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केल.

हेही वाचा -Dr. Rashmi Borikar : 'इंडियन नर्सिंग काँसिल अभ्यासक्रमात हुंडा प्रथेला केलेले समर्थन चुकीचे'

ABOUT THE AUTHOR

...view details