औरंगाबाद -वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या समर्थनगर येथील शाखेतून ६७ किलो सोने लंपास करत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या राजेंद्र जैनने (रा. बालाजीनगर) आर्थिक व्यवहार केलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू झाली आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या जैनने वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये घोटाळा केल्यानंतर चार ते पाच जणांसोबत लाखो रुपयांचे व्यवहार केले होते.
वामन हरी पेठे घोटाळा प्रकरण; जैनने आर्थिक व्यवहार केलेल्यांची चौकशी सुरू - Waman Hari Pethe scam case
आर्थिक गुन्हे शाखेने ४ जुलै रोजी सुरूवातीला ५८ किलो सोन्याचा घोटाळा केल्याप्रकरणी ज्वेलर्सचे व्यवस्थापक अंकुर अनंत राणे (रा. सन्मित्र कॉलनी, मुळ रा. दापोली, जि. रत्नागिरी), राजेंद्र जैन व त्याचा भाचा लोकेश जैन (२१, दोघेही रा. बालाजी नगर ) यांना अटक केली होती.
आर्थिक गुन्हे शाखेने ४ जुलै रोजी सुरूवातीला ५८ किलो सोन्याचा घोटाळा केल्याप्रकरणी ज्वेलर्सचे व्यवस्थापक अंकुर अनंत राणे (रा. सन्मित्र कॉलनी, मुळ रा. दापोली, जि. रत्नागिरी), राजेंद्र जैन व त्याचा भाचा लोकेश जैन (२१, दोघेही रा. बालाजी नगर ) यांना अटक केली होती. त्यानंतर राजेंद्रने सोने विकलेल्या सराफा व्यवसायिक राजेंद्र सेठिया यालादेखील पोलिसांनी अटक केली. परंतू जैन ने हा घोटाळा करून बाजारात कोट्यवधी रुपये व्याजाने दिले होते. त्यातील काही तीन ते चार लोकांसोबत त्याने सर्वाधिक व्यवहार केल्याचे समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेने आता या सर्वांची चौकशी सुरू केली असून त्यांचे जवाब नोंदवण्यास प्रारंभ केला आहे. गुरूवारी यातील काहींना नोटिसा देऊन पोलीस आयुक्तालयात बोलावण्यात आले होते.