औरंगाबाद- विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती अर्थात बुद्ध पौर्णिमा बुधवारी शहरात लेणी परिसरांमध्ये बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करतात. मात्र, कोरोना आजाराचा संसर्ग वाढत असल्यामुळे प्रशासनाने बुद्ध पौर्णिमा साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनुयायांनी घरीच राहून साध्या पद्धतीने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
दरवर्षी लेणी परिसरामध्ये खेळण्या, पुस्तक, खाद्यपदर्थां, साहित्य दुकाने थाटलेली असतात. मात्र, यंदा कोणालाच परवानगी नसल्यामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेऊन पंचशील ध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
गरजूंना साहित्य वाटप